Thursday, 11 June 2020

बंध...


शब्द माझे थिटे होऊनी
आज अबोल जाहले
साथ तुझी सख्या अनोखी
मी तृप्त जाहले

शब्द तुझे शब्द नव्हते
होत्या हळव्या भावना
कण जणू हे  भाव शीतल 
श्रांत करती वेड्या मना

तू आहेस, अन् असशील
ही जाणीव खरी, ना वल्गना
मी पूर्ण तरीही अपूर्ण
सोबतीस तू या जीवना

राहो असेच हे बंध, अबोध
तुझ्या नि माझ्या जीवना
तू दूर तरी माझ्या मनी
हळव्या अबोल  या भावना


मजहब ...

आज भी याद है वो पल
जब हम थे तुम थे
और कुछ सूनहरे पल थे
प्यार था नजरो मे
दो पल यहा आजाद थे
तब ना थीं ये मजहब
की दीवारे ना ही कोई गम थे
एक दिन लकीर क्या खीच दी
सारे रिश्ते ही बदल गये
तुम हो गये हिन्दू और हम 
मुसलमान बन गये
अब ना था ये मुमकिन
की हम ता उम्र खिल सके
 तुम्हा री  बाहोमे, कहने के लिये
 था सहारा उन चंद लमहो का
 जो हमने गुजारे थे
 ऐसे ही कट गये दीन राते
 आज अचानक बेवक्खत
 वो सारे पल याद आये
 जब मैने पढा किसी पंनो
 पर की मजहब प्यार करना
 सिखाता है....


पाऊलखुणा....

हसऱ्या माझ्या मनात
तुझ्या हळव्या पाऊलखुणा
काय सांगू सख्या रे
मन माझे वेडे पुन्हा

आठवत आहे सारे क्षण
ते रस्ते अन् ओळखीच्या खुणा
काय सांगू सख्या रे
मन माझे वेडे पुन्हा

अत्तराचा तो सुवास 
जाणीव त्याची अल्लड मना
काय सांगू सख्या रे
मन माझे वेडे पुन्हा

आवाज तुझा माझ्या कानी
जणू विसावे शांतपणा
काय सांगू सख्या रे
मन माझे वेडे पुन्हा

स्पर्श तुझा ओला गहिरा
जागवी अधीर स्पंदना
काय सांगू सख्या रे
मन माझे वेडे पुन्हा

अस्तित्व तुझे माझ्या मनी
जणू  भारलेल्या भावना
काय सांगू सख्या रे
मन माझे वेडे पुन्हा

वाटे धावावे वाऱ्यापरी
अन् भेटावे तुझ्या मना
काय सांगू सख्या रे
मन माझे वेडे पुन्हा

काय सांगू तुला सख्या रे
कसे थांबवू माझ्या मना
कश्या व्यक्त करू या भावना
मन माझे वेडे पुन्हा

नाते अपुले

नाते हे अपुले 
कुठले अनामिक 
राहुदे प्राजक्ता परी
अर्थ अपूर्ण ओळींमधले
जपुया मन मंदिरी
नाते हे अपुले
कुठले अनामिक
राहू दे मोगऱ्या परी
सुवास त्याचा दरवळू दे
आपुल्या आयुष्या वरी
नाते हे अपुले 
कुठले अनामिक
राहू दे जाई परी
अल्लड कोमल खरा भाव हा
उमटेल ही हृद्यावरी
नाते हे अपुले 
कुठले अनामिक
राहू दे अनंता परी
अस्तित्व त्याचे मोहरुदे
शेवटच्या  श्वसा वरी

चारोळ्या


1) 
भावनांचा वेग माझ्या 
सावरेना आवरेना
काय सांगू तुला सख्या
रे ओघ आतला का विरेना

2)
होतास तू जवळी म्हणुनी
मी मोकळी जाहले
शब्द सारे का कळेना
अश्रूच होऊन वाहिले

3)
स्पर्श तुझा हळवा सख्या
जीव श्रांत जाहला
अस्वस्थ या मनास माझ्या
जणू किनारा लाभला
4)
खामोश तुम खामोश हम भी
अब अल्फाजो का सहारा नही लगता
रुह से रुह का राबता है काफी
अब ना मिलने का गम नही होता

5)
तू तिथे अन् मी इथे
पण मन वेडे गुंतले
काय सांगू मैत्रीचे
अर्थ नवे मज उमगले





Wednesday, 10 June 2020

तू


तू असण्याची आताशा सवय झालिये मला
तुझं बोलणं तुझं असणं
मनात भरून राहतं
माझंही मन मग
भरभरून लागत बोलायला
तू असण्याची आताशा सवय झालिये मला
तू असतोस
कधीतरी असून नसतोस
तुझ्या असण्याच्या नुसत्या खुणा
शांत करतात मनाला
तू असण्याची आताशा सवय झालिये मला
कधी एखाद्या कातरवेळी
मन बावर होत
शब्द तुझे भारलेले
देतात बळ जीवाला
तू  असण्याची आताशा सवय झालिये मला
तू नसशील कधीतरी
स्पर्शून जातो विचार
क्षण तुझ्या कवेतले
देतील नवा आधार
हा विश्वास वाटतो मनाला
तू असण्याची आताशा सवय झालिये मला

क्यो है पता नाही.....

ए दोस्त तुम्हे पहचान
रही हू
या खुदसे ही मुलाकात
हो रही है पता नही

दोस्ती तो कुछ दिन की है
पर  एहसास बहोत पुराना
क्यो है पता नाही

वक्त गुजर जाता है
हम भी बदल जाते है
पर कुछ बाते नही बदलती
क्यो पता नही

यहा अपने तो बहुत है
पर तुम्हारी बात कुछ अलग है
एैसा क्यो पता नही

क्षण

क्षण एखादा तुझ्या कवेत विसावा
क्षण एखादा निवांत असावा

क्षण एखादा असावा असा
जिथे नसावी कसली बंधने
क्षण एखादा जगवा असा
भाव वेगळा अधीर स्पंदने

क्षण एखादा तुझ्या साठी झुरावा
क्षण एखादा निवांत असावा

क्षण एखादा असावा असा
हात तुझा हातात असावा
क्षण एखादा जगवा असा
डोळ्यातून भाव वहावा

अशा क्षणासाठी माझी ओंजळ अधीर
वाटे कण कण वेचावा सुमधुर

Tuesday, 9 June 2020

मंजिल

मंजिल का पता नहीं
मगर सफर की आंस है
रिष्ते बेनाम सही
पर एहसास तो खास है

पहले भी मिले थे हम खुद से
आज अलग मुलाकात है
साथ तूम्हारा हमसफर
कुछ सुफियाना अंदाज है

कहने के लिये तो
सब कुछ ही पास है
मगर जाने क्यो
अधुरा एहसास है

तुम ना हो के भी हो
राबता ये खास है
तनहा होके भी हम ना अकेले
तुम्हारी इनायत ही कुछ खास है

Monday, 8 June 2020

कोरड्या माझ्या मनात का उगाच ओल आहे.....


कोरड्या माझ्या मनात
का उगाच ओल आहे
जाणती अजाणती
ही कुठली बोच आहे

रोजचीच मी परंतु
का अबोल शब्द आहे
घोळक्यात माणसांच्या
परी मी एकटीच आहे

वाटती परकेच सारे
उरी तुझी चाहूल आहे
अस्वस्थ आहे मन परंतु
का मुखी हास्य आहे

मी न आहे कोणाचीच
जणू एकटी एकाकी आहे
भाव वाही परी मनातून
बोचरे जणू शल्य आहे

कवाडे मनाची बंद सारी
प्रकाश ही मम वर्ज्य आहे
कुठे जाऊ कुणा सांगू
मन माझे अशांत आहे

किनारे जुने शोधिसी तू
तेही सारे व्यर्थ आहे
एकटी असण्याचा सखे
हाच नवा अर्थ आहे

कोरड्या माझ्या मनात
का उगाच ओल आहे

Sunday, 7 June 2020

बोगदा

आयुष्याची वाट काळोखी
जणू अंधारा बोगदा
दाव आता दाव देवा
किरण आशेचा एकदा

आले इथे ना जाणुनी
रस्ता भयभीत एकटा
अबला मी विकतेच आहे
माझीच देह संपदा

नजरा विखारी झेलूनी
जपते परी मी अस्मिता
काय गुन्हा झाला असा
अन् जाहले  मी वंचिता

सामर्थ्य सारे एकवटूनी
उभी राहिली ही माता
बाळा तुझ्या रुपात गवसला
कोवळा सोनेरी कवडसा

अस्तित्व तुझे तारूनी
मी जाहले भय मुक्ता
प्रकाश दिसला अभिमानाचा
सरला अंधारा बोगदा


हात तुझा हातात गुंफून.....


हात तुझा हातात गुंफून
वाटे चालावी वाट निराळी
जिथे नसे कसलेही बंधन
क्षण अनुपम नाती आगळी

हात तुझा हातात गुंफून
वाटे पहावे उंच गिरिवर
होऊन निःशब्द काठापाशी
न्याहळावे उंच तरूवर

हात तुझा हातात गुंफून
पुन्हा विसरावे माझे मीपण
हलके होई ओझे वयाचे
जणू गवसावे मुक्त बालपण


थेंब


थेंब एकदा मला म्हणाला
तळ्याचे ठीक आहे राव पण
पण प्रश्न माझ्याही अस्तित्वाचा होता

माझ्यातही होते दडलेले विश्वाचे प्रतिबिंब
पण तळ्यात विरून जाण्यातच खर्ची पडला जन्म

तळ्यात पडण्या पूर्वी मी होतो ...
एक परिपूर्ण ओथंबलेले अस्तित्व
आता तळ्यात मिसळून गेल्यानंतर
वेड्या का शोधिसी स्वत्व

जग हे असच आहे, तुझं अस्तित्व
अजूनही "म्हणीत" आहे
 खरं शोधायला गेलं तर
ते कवडी पेक्षा स्वस्त आहे.

मी मात्र कळून सत्य, 
केले थेंबाचे सांत्वन
म्हटलो त्यास, अस्तित्व तुझे मित्रा कोणी नाकारीत नाही
तळ तुझ्याशिवाय भरत नाही अन्
कविता माझी तुझ्याशिवाय साकारत नाही

तू होतास आहेस आणि राहशील
पावसाचा, रक्ताचा, गालावर ओघळणाऱ्या भावनांचा थेंब म्हणून अजरामर होशील...


Friday, 5 June 2020

काले घोडे की नाल की अंगुठी



आज सडक पे  एक काला घोडा देखा
उमदा , काला राजस जांनवर
ऐसा लगा किसी राजा के साथ
निकल पडेगा सवारी पे

कैसा निकलेगा अभागी वो
जो बंधा हुअा था एक गाडी से
गाडी मे थी खूप सारी अंगुठीया
कुछ बडी कुछ छोटी कुछ नक्कासी वाली

उसका मालिक चिल्ला रहा था
ले लो ले लो......
काले घोडे की नाल की अंगुंठीया
आपके हर सवाल का जवाब देगी
धंदेमे बरकत आयेगी, आपका प्रेम पाओगे
ले लो ले लो......
काले घोडे की नाल की अंगुठिया

लोग तो जैसे टूट पडे थे
अपनी  अपनी किस्मत सवारनेमे लगे थे
हर कोई इस उम्मिद मे था अब तो सब ठीक होगा
मालिक तो खूश था जैसे जैसे अंगुठीयोंका ढेर
कम हो जा रहा था

इन सबमे वो काला घोडा कहा था
उस बिचारे की तो ये भी नहीं पता था
की काला रंग होता कैसे है
वो तो खो गया था अपनी ही खयालोंमे
औ र  हो गया था लुप्त उसकी ही नाल की
अंगुठियो मे.......