Friday, 5 June 2020

वाटे मजला.....

वाटे मजला, कधी चिमुकला
हात माझ्या हाती विसावा
इवलुसा कोणी, जाता थकूनी
मायेच्या या कुशी निजावा

वाटे मजला,  साखरपापा
माझ्याही गाली रुळावा
हट्ट बोलका,अन  भाव भाबडा
नितळ निरागस मनी असावा

वाटे मजला, गोष्ट सांगुनी
डोळ्यात गोजिरा भाव पहावा
लहान होऊनी संगे त्याच्या
बालपणीचा खेळ खेळावा

वाटे मजला, क्षण एक असा
ओंजळीत माझ्याही विसावा
अधीर मन, अन् रोमांच शरीरी
जणू आईपणाचा सोहळा व्हावा

No comments:

Post a Comment