आज मनात खूप द्वंद चालू होत
का कोण जाणे पण आई व्हावं वाटत होत
वाटत होत आपल्याही हातात
तो चिमुकला हात असावा
कुशीत शिरून मायेच्या या
घ्यावा त्याने विसावा
माझ्यातल माय मन रडत होत
का कोण जाणे पण आई व्हावं वाटत होत
वाटत होत इवलेसे स्वप्नाळू डोळे
साठवून ठेवावे हृदयात
हळुवार उमटणारे बोबडे बोल
जपून ठेवावे मनात
मन माझं जणू भरलेल आभाळ झालं होत
का कोण जाणे पण आई व्हावं वाटत होत
वाटत होत मोकळं निरागस हसू
दडवावे गाभाऱ्यात
अन् त्याच्या अस्तित्वाची अल्लड चाहूल
सापडावी डोहाळयात
नियतीच्या मनात मात्र काही वेगळच होत
का कोण जाणे पण आई व्हावं वाटत होत
वाटत होत इवलासा जीव त्याचा
झेपावूदे मम मिठीत
क्षण आनंदाचा हा निराळा
साठवेन मी दिठीत
जाग आली अन् उमगले लोचनी सुख स्वप्न होत
का कोण जाणे पण आई व्हावं वाटत होत
जाणीव होती कुठली आज, की अनामिक दुःख होत
स्पर्श सख्या तुझा गहिरा अन् मन विश्रांत होतं
का कोण जाणे पण आई नसण्याच दुःख आता ओसरल होत......
छान...अप्रतिम भावनांची ऊत्कटता!!!
ReplyDelete