Sunday, 7 June 2020

थेंब


थेंब एकदा मला म्हणाला
तळ्याचे ठीक आहे राव पण
पण प्रश्न माझ्याही अस्तित्वाचा होता

माझ्यातही होते दडलेले विश्वाचे प्रतिबिंब
पण तळ्यात विरून जाण्यातच खर्ची पडला जन्म

तळ्यात पडण्या पूर्वी मी होतो ...
एक परिपूर्ण ओथंबलेले अस्तित्व
आता तळ्यात मिसळून गेल्यानंतर
वेड्या का शोधिसी स्वत्व

जग हे असच आहे, तुझं अस्तित्व
अजूनही "म्हणीत" आहे
 खरं शोधायला गेलं तर
ते कवडी पेक्षा स्वस्त आहे.

मी मात्र कळून सत्य, 
केले थेंबाचे सांत्वन
म्हटलो त्यास, अस्तित्व तुझे मित्रा कोणी नाकारीत नाही
तळ तुझ्याशिवाय भरत नाही अन्
कविता माझी तुझ्याशिवाय साकारत नाही

तू होतास आहेस आणि राहशील
पावसाचा, रक्ताचा, गालावर ओघळणाऱ्या भावनांचा थेंब म्हणून अजरामर होशील...


1 comment:

  1. म्हटलं तर अगदी साधी सोपी कल्पना आणि म्हटलं तर अध्यात्मिक सार कोळून प्यायलेली. अप्रतिम!!

    ReplyDelete