नवीन आशा नवीन वाटा
जशा उमटल्या पाण्यावर लाटा
मुग्ध मोकळा मुक्त प्रवासी
जणू निघाला नव्या प्रवासा
अनवट वाटा अवघड वळणे
अज्ञातातील स्वप्नं दिवाणे
दूर क्षितिजे दिसता सारी
सुख दु:खाची न्यारी सवारी
एका वळणावरती परंतु
परी थांबला मुग्ध प्रवासी
शांत निळा तो प्रकाश गहिरा
असीम सुखाची ओढ जराशी
No comments:
Post a Comment