हरवलेले काही क्षण
अलगद वाकून वेचत असताना
ओंजळीतली आठवणींची बकुळ फुले
अस्वस्थ होऊन म्हणाली
आमच्याकडे पहायचं सोडून
का वेचत आहेस तू ते हरवलेले क्षण
मी हसून त्यांना म्हणाले
तुम्ही आज ओंजळीत आहात
कारण मी काहीं क्षण हरवले आहेत
त्या कोमजेलेल्या क्षणांच्या पाकळ्या
तुमच अस्तित्व खुलवत आहेत
ते नाहीत म्हणून तुमचा सुगंध
मला जाणवत आहे
म्हणूनच वेचत आहे मी ते क्षण
तुमच्या असण्याचा अर्थ उमगण्यासाठी
No comments:
Post a Comment