शब्द माझे थिटे होऊनी
आज अबोल जाहले
साथ तुझी सख्या अनोखी
मी तृप्त जाहले
शब्द तुझे शब्द नव्हते
होत्या हळव्या भावना
कण जणू हे भाव शीतल
श्रांत करती वेड्या मना
तू आहेस, अन् असशील
ही जाणीव खरी, ना वल्गना
मी पूर्ण तरीही अपूर्ण
सोबतीस तू या जीवना
राहो असेच हे बंध, अबोध
तुझ्या नि माझ्या जीवना
तू दूर तरी माझ्या मनी
हळव्या अबोल या भावना
So taken up writing Kavita, good
ReplyDelete