आज पावसात चिंब भिजले होते
माझ्या आतला पाऊस
अन् हा बाहेरचा पाऊस
जणू एक झाले होते
मन माझे पिसापरी
हलके झाले होते
आज पावसात चिंब भिजले होते
धरतीने मेघांना मायेने पुकारले होते
मेघ वेडे बेभान होऊन
मुक्त स्वच्छंद कोसळले होते
आज पावसात चिंब भिजले होते
मनातले सारे सल
आज डोळ्यात उमटले होते
तू होतास माझी धरित्री
अन् मी मेघांपरी ओसंडले होते
आज पावसात चिंब भिजले होते
मनी दाटले मेघ काळे
आज गर्जूनी बरसले होते
मळभ सारे हे सरूनी
कल्लोळ मनातले विरले होते
आज पावसात चिंब भिजले होते
मी होते जुनीच
परी नव्याने बहरले होते
आज पावसात चिंब भिजले होते
No comments:
Post a Comment