तुझी आठवण, येता मनात
क्षण दाटले डोळ्यात सारे
भेट ना होई जरी आपुली
जवळच भासशी तू सख्या रे
निःशब्द संवाद कित्येक होती
नसती आता शब्दाचे धुमारे
असतोस तू, कधी नसतोस तरीही
मन माझे का उगा गहीवरे
क्षण तुझे अन् क्षण माझे
अनुभवले जणू मृद्गंध निराळे
वाट पाहते तुझी सखया
मन माझे आतुर आता रे.....
No comments:
Post a Comment