Friday, 5 June 2020

एका मैत्रीची कहाणी.....



आज सांगते मित्रा तुला
एका मैत्रीची कहाणी
मित्र होता मैत्रीण होती
अन्  होती सुरेल गाणी

ओळख झाली त्यांची
अन् सुर  सुरेख जुळले
आज अचानक मन पुन्हा
आठवणीत त्या रमले

गप्पा, चर्चा यातून
बहरली विचारांची साठवण
प्रत्येक क्षण सहवासाचा
झाली अनमोल आठवण

सहवासाची ओढ, लागली
त्याला अन् तिलाही
मन गुंतले परस्परांचे
दिली मनाने ग्वाही

संवाद झाला सुरू अनोखा
दोघांमधला अमूल्य ठेवा
नव्हती तिथे कुठली बंधने
मुक्त मोकळा श्वास घ्यावा

असा प्रवास नात्याचा या
निरंतर चालू राहुदे
वेड्या वाकड्या वळणावरून
असाच अविरत वाहू दे...

No comments:

Post a Comment