कोरड्या माझ्या मनात
का उगाच ओल आहे
जाणती अजाणती
ही कुठली बोच आहे
रोजचीच मी परंतु
का अबोल शब्द आहे
घोळक्यात माणसांच्या
परी मी एकटीच आहे
वाटती परकेच सारे
उरी तुझी चाहूल आहे
अस्वस्थ आहे मन परंतु
का मुखी हास्य आहे
मी न आहे कोणाचीच
जणू एकटी एकाकी आहे
भाव वाही परी मनातून
बोचरे जणू शल्य आहे
कवाडे मनाची बंद सारी
प्रकाश ही मम वर्ज्य आहे
कुठे जाऊ कुणा सांगू
मन माझे अशांत आहे
किनारे जुने शोधिसी तू
तेही सारे व्यर्थ आहे
एकटी असण्याचा सखे
हाच नवा अर्थ आहे
कोरड्या माझ्या मनात
का उगाच ओल आहे
अतिशय उत्तम
ReplyDeleteWaw. Mast medha
ReplyDeleteMast!!
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteउत्तम
ReplyDelete